देवगड-तेलीवाडी-गढीताम्हाणे एसटी अनियमित

देवगड-तेलीवाडी-गढीताम्हाणे एसटी अनियमित

Published on

96450

देवगड-तेलीवाडी-गढीताम्हाणे एसटी अनियमित
विद्यार्थ्यांची गैरसोयः ग्रामस्थांनी वेधले आगार व्यवस्थापकांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ः येथील आगारातून सुटणारी देवगड तेलीवाडी गढीताम्हाणे ही एसटी फेरी अनियमित येत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय सोसावी लागत होती. यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील रहाटेश्वर आणि गढीताम्हाणे येथील ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले. आपल्या मागणीचे निवेदन येथील आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना ग्रामस्थांनी यावेळी दिले. दरम्यान, ही फेरी वेळेत सोडण्याचे आश्‍वासन श्री. लाड यांनी ग्रामस्थ शिष्टमंडळाला दिले.
ही फेरी अनियमित सुटत असल्याने बरेचदा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. पावसाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय सोसावी लागते. त्यामुळे ही एसटी नियमित सोडण्यात यावी यासाठी रहाटेश्वर आणि गढीताम्हाणे ग्रामस्थांनी येथील आगार व्यवस्थापक श्री. लाड यांची भेट घेतली. यावेळी आनंद मोरे, अमित कदम, स्वरा पांचाळ, सुरेंद्र कदम, महादेव तांबे, रितेश कदम, कृणाल लाड, पार्थ लाड, अनिमेष धुरी, शुभम मेस्त्री, करण घाडी, आनंद वाडकर, श्रेयस वानिवडेकर, प्रदीप मोरे, प्रताप कदम, आर्यन राणे, आनंद बांदकर आदी उपस्थित होते. गढीताम्हाणे, रहाटेश्वर या भागातील मुले तळेबाजार व देवगड हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येतात. मुलांसाठी गेली कित्येक वर्ष आगारातून देवगड ते गढीताम्हाणे तेलीवाडी पर्यंत एसटी सोडली जातं. मात्र ही फेरी अनियमित असते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना एसटी नसल्यामुळे पावसात भिजतच चालत जावे लागत असल्याने रात्री घरी जाण्यास विलंब होतो. तसेच दुसर्‍या दिवशी सकाळी पर्यायी अन्य गाडीसाठी धावपळ करत एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत यावे लागते. एसटी वाहतुकीमुळे होणारी शालेय विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता ही फेरी नियमित वेळेत सोडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी दिले. दरम्यान, आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांनी ही फेरी नियमित सोडण्याचे आश्वासित केले. त्यानुसार आज साडेचार वाजता आगारातून देवगड गढीताम्हाणे तेलीवाडी गोवळ ही बस सोडण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.