मच्छीमार नौकांना एकाच प्रकारचा परवाना द्या

मच्छीमार नौकांना एकाच प्रकारचा परवाना द्या

Published on

मच्छीमार नौकांना एक परवाना द्या

जावेद होडेकर ः पर्ससीन नेट परवान्याबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः मत्स्योद्योग विकास धोरणात सर्वच प्रकारच्या मच्छीमार नौकांना एकाच प्रकारचा मासेमारी परवाना दिला जावा, अशी मागणी पर्ससीन नेट मच्छीमारांकडून केली आहे. राज्य मत्स्योद्योग विकास धोरणासाठी हा अभिप्राय मत्स्योद्योग विकास धोरण बनवणाऱ्या समितीसाठी पाठवण्यात आला असल्याचे रत्नागिरी तालुका पर्ससीननेट मालक असोसिएशन सचिव जावेद होडेकर यांनी सांगितले.
पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छीमारांमध्ये वादंग निर्माण होतो. ज्याप्रमाणे कोणतेही पिक घेणाऱ्यास शेतकरी संबोधले जाते, त्याप्रमाणे मासेमारी करणाऱ्या सर्वच नौकाना एकच मासेमारी परवाना देण्याची मागणी केली आहे. सोमवंशी अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात १८३ पर्ससीन नौका असाव्यात, असे म्हटले आहे. परंतु जिल्ह्यातील पर्ससीन नेट नौकांची संख्या सुमारे २८० पर्यंत असल्याने मासेमारी हंगाम सुरू करण्याची वेळ आली तरीही परवान्याबाबत संभ्रम आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. राज्य मत्स्योद्योग विकास धोरण ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे मच्छीमार संस्था, व्यावसायिक, संघटनांनी हे धोरण कसे अपेक्षित आहे, याबाबत अभिप्राय पाठविण्याचे आवाहन केले होते.
----------
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com