क्रीडाई बैठकीस  १७ शहरांतून 115 सदस्य उपस्थित

क्रीडाई बैठकीस १७ शहरांतून 115 सदस्य उपस्थित

Published on

- rat२६p६.jpg
P२४N०७०२५
- आंबोली ः क्रेडाईच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित पदाधिकारी.

आंबोलीत क्रिडाईची राज्यस्तरीय बैठक

१७ शहरांतून ११५ सदस्य सहभागी ; पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः क्रिडाईच्या महाराष्ट्र दक्षिण-पश्चिम विभागाची चौथी विभागीय बैठक क्रिडाई गडहिंग्लज आणि क्रिडाई कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली येथील डार्क फॉरेस्ट रिसोर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्रातील १७ शहरांमधून ११५ सदस्य उपस्थित होते.
क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव पारीख यांनी बांधकाम व्यवसाय व्यवस्थापनेसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याबाबत मार्गदर्शन केले तसेच रेरा समितीचे सहसंयोजक आदित्य बेडेकर यांनी रेरा कायद्यात पुढील काही काळात होणारे बदल व रेरा कायद्यातील नवनवीन सुधारणा याबद्दल माहिती दिली. येणाऱ्या काळात रेरा कायदा समजून घेऊन विकासकामे करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले. प्रकाश देवळापूरकर यांनी प्लॉटिंग, बिनशेती, प्लॉटिंगमधील जीएसटी कायद्यातील तरतुदींचे महत्व काय याबाबत माहिती दिली. सेवानिवृत्त सर्कल इन्स्पेक्टर शिवकुमार पाटील आणि संगणक ऑपरेटर कृष्णनाथ जाधव यांनी शासनाच्या महसूल कायद्यातील डिजिटलायजेशन पद्धतीने बनवण्यात येणारे ई-सातबारा (७/१२) आणि ई-चावडी ऑनलाईन कसे वाचावे, त्याचा वापर बांधकाम व्यवसायात कसा करता येईल याबाबत प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन केले. क्रिडाई कागल यांनी ऋषिकेश मगर, रियल इस्टेटमध्ये ब्रँण्डिग कसे करायचे, त्याचा फायदा बांधकाम व्यवसायात कसा होईल याबाबत सर्व विकासकामांना मार्गदर्शन केले. क्रिडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते, क्रिडाई महाराष्ट्र दीपक साळवी आणि बोर्ड सदस्य प्रवीण लाड उपस्थित होते.
---------
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com