नाचणे शाळेतर्फे सत्कार

नाचणे शाळेतर्फे सत्कार

Published on

-rat२६p१५.jpg -
२४N०७०३८
नाचणे : लोककलावंत सुनील बेंडखळे यांचा नाचणे शाळेतर्फे सत्कार करताना मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये. सोबत सौरभ मलुष्टे यांच्यासह शिक्षकवृंद.

लोककलावंत बेंडखळे यांचा सत्कार

रत्नागिरीतील नाचणे शाळेतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील नाचणे शाळा क्र. १ मध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर यांचा सत्कार करण्यात आला. बेंडखळे यांना मुंबई येथे प्रशांत दामले, अशोक सराफ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल नाचणे येथे त्यांचा गौरव करण्यात आला.
''कोकणचा साज संगमेश्वरी बाज'' या लोकनाट्यामध्ये तात्या गावकर यांची मध्यवर्ती भूमिका सुनील बेंडखळे रंगवतात. या लोकनाट्याचे महाराष्ट्रभरात सुमारे साडेचारशे प्रयोग झाले आहेत. या लोकनाट्याद्वारे कोकणातील भजन, जाखडी, नमन, पारावरची नाटकं यासारख्या लोककलांचे ‘संगमेश्वरी’ भाषेत विनोदी शैलीत सादरीकरण केले जाते. या द्वारे मनोरंजनासोबतच प्रबोधनही केले जाते तसेच या द्वारे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले असून, अनेकांना आर्थिक मदतही केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नाचणे शाळा क्र. १ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योजक सौरभ मलुष्टे, प्रा. सुनील जोपले, मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये, शिक्षक दीपक नागवेकर, शरदिनी मुळ्ये, विनोदिनी कडवईकर आदी उपस्थित होते.
----------
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com