

-rat२६p१६.jpg-
२४N०७०३९
रत्नागिरी : जागृत हिंदू समाजातर्फे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डावीकडून राकेश नलावडे, संजय जोशी, तनया शिवलकर आणि गणेश गायकवाड.
-------------------
हिंदू गर्जना मोर्चासाठी उद्या रत्नागिरी बंदची हाक
जागृत हिंदू समाज ; बांगलादेशातील हिंदूंना समर्थन देण्याचा प्रयत्न, विविध संघटनांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी रत्नागिरीतील जागृत हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरूवारी (ता. २९) सकाळी मारूती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर मोर्चा काढला जाणार असून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. या दिवशी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून रत्नागिरी बंदची हाक दिलेली आहे. शहरातील व्यापारी, दुकानदार, विविध संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
भारतात १९४० मध्ये खलिफाला समर्थन देण्यासाठी भारतात खिलाफत चळवळ सुरू होती. आता बांग्लादेशमधील हिंदूंवर अन्याय होत असल्याने भारतातही विविध ठिकाणी हिंदूंच्या समर्थनार्थ चळवळ उभी राहत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात येत आहे व बांगलादेशातील हिंदूना पाठिंबा दर्शवला जात आहे. बांगलादेशवरील युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार १९७१ ला २० लाख हिंदूंना मारले गेले. १९९२ ला २८ हजार हिंदूंची घरे जाळण्यात आली, शेकडो स्त्रियांवरती अत्याचार करण्यात आले. १९७८, १९८९ ला व आता २०२४ ला सनातनी हिंदूंवरती अत्याचार करण्यात येत आहेत. दरवर्षी अंदाजे २ लाख ३० हजार ६१२ हिंदू बांगलादेशमधून गायब होत आहेत. २ ते ५ ऑगस्ट या ४ दिवसांमध्ये २०५ ठिकाणी हल्ले झाले. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून २९ ऑगस्टला हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा मारूती मंदिर, माळनाका, जिल्हा शासकीय रुग्णालयमार्गे जयस्तंभापर्यंत काढण्यात येणार आहे.
---------
अत्यावश्यक सेवा वगळल्या
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी रत्नागिरीतील जागृत हिंदू समाजातर्फे गुरुवारी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा मोर्चा मारुती मंदिर, माळनाका, जिल्हा शासकीय रुग्णालयमार्गे जयस्तंभापर्यंत काढण्यात येणार आहे. या बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार, विविध संघटांनी पाठिंबा दिला असल्याचे असल्याचे राकेश नलवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.