रत्नागिरी- बेंचमार्क आयटी कंपनीमध्ये निवड
‘फिनोलेक्स’च्या १४ विद्यार्थ्यांची ‘बेंचमार्क आयटी’मध्ये निवड
कंपनीकडून बुद्धीमता, वैयक्तिक मुलाखती ; १८ अधिकाऱ्यांचे पथकांने घेतली परीक्षा
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २७ : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या १४ विद्यार्थ्यांची ‘बेंचमार्क’ या आयटी कंपनीमध्ये नोकरी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
बेंचमार्क कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह फिनोलेक्स अॅकॅडमीच्या कॅम्पसमध्ये आयोजित केला होता. या प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे १८ अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती.
निवड प्रक्रियेमध्ये बुद्धिमत्ता परीक्षा, कोडिंग परीक्षा, वैयक्तिक इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू या चाचण्यांचा समावेश होता. या कंपनीमध्ये गौरेश तांबे (सीएसई), सुमित राजम (सीएसई), अफन फोंडू (सीएसई), ओम परब (सीएसई), जाफर बेलदार (आयटी), विश्ववेद केळकर (आयटी), रिद्धी मांजरेकर (आयटी), ऋषिकेश सुर्वे (आयटी), दिव्या वेरेकर (आयटी), यशोधन देवधर (आयटी), उझईफ इसानी (एमसीए), पांडुरंग शिरसाट (एमसीए), ओंकार माळवदे (एमसीए), प्रवत बेरा (एमसीए) या विद्यार्थ्यांची नोकरी, औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण २०२५ ला पूर्ण होणार असून, त्यांना आताच नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----
शिक्षण पूर्ण होण्याआधी निवड
फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेडमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या १४ विद्यार्थ्यांची आयटी कंपनीमध्ये निवड झाली. त्यांचे पदवीचे शिक्षण हे २०२५ ला पूर्ण होणार आहे. शिकत असतानाच नोकरीची संधी प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पालकांनीही फिनोलेक्सचे कौतुक केले.
-------------
--------
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

