

कृषी यांत्रिकीकरणासाठी १४८ जणांची निवड
शत्रुघ्न म्हेत्रे ः १६ लाख ४७ हजार रुपये वितरित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : शासनाच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात चिपळूण तालुक्यातील १४८ लाभार्थ्यांची निवड झाली होती. अवजारे खरेदी केलेल्या ७२ शेतकऱ्यांना चिपळूण कृषी विभागातर्फे १६ लाख ४७ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या लागणाऱ्या अवजारांचा (ट्रॅक्टर, पॉवरटिलर व इतर अवजारे) लाभ घेता येतो. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती घटकांतील, २ हेक्टरपेक्षा जमीन, सर्वसाधारण प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान तर सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. या योजनेंतर्गत चिपळूणमधील शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात लॉटरी पद्धतीने १४८ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यापैकी अवजारे खरेदी केलेल्या ७२ शेतकऱ्यांना १६ लाख ४७ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
-----------
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.