पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा
-rat२६p१९.jpg-
२४N०७०८१
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पहिला राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक.
------------------
‘अभ्यंकर महाविद्यालयात’
राष्ट्रीय अवकाश दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी केले. गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयातील (स्वायत्त) खगोल मंडळाचे समन्वयक प्रा. बाबासाहेब सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अवकाश दिनाचे महत्व सांगितले. अवकाशशास्त्र क्षेत्रातील भविष्यातील संधीची माहिती दिली. प्रा. सुनील गोसावी यांनी चांद्रयान मोहिमेतून विद्यार्थ्यांनासुद्धा वेगवेगळ्या संधीचे अवकाश उपलब्ध झाले आहे, असे सांगितले. या वेळी पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव मंडळाचे सेक्रेटरी प्रा. महेश नाईक, कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर तसेच पोस्टर प्रेझेन्टेशन समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

