-गणेश मूर्तिशाळांमध्ये रंगकाम सजावटीची लगबग

-गणेश मूर्तिशाळांमध्ये रंगकाम सजावटीची लगबग

Published on

-Rat२६p९.jpg-
P२४N०७०२९
तुळशी : प्रथमेश सागवेकर यांच्या रंगशाळेत रंगकाम करताना मूर्तिकार.
--------------
गणेश मूर्तिशाळांमध्ये रंगकाम सजावटीची लगबग

मंडणगड तालुक्यातील चित्र ; उंच मूर्तींचा अट्टाहास नाही; आकर्षकची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः कोकणवासियांचा सर्वात मोठा लाडका गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तालुक्यातील मूर्तिकार व त्यांच्या मूर्तिशाळांमध्ये गणेशमूर्तीचे रंगकाम व मूर्तीच्या सजावटीचे काम सुरू असल्याने सजावट करणारे, रंगकाम करणारे व मूर्तिकाम करणाऱ्या सर्वच कलाकारांची लगबग वाढली आहे.
मंडणगड तालुक्यात १८ ठिकाणी सार्वजनिक व मोठ्या संख्येने घरात खासगी स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. तालुक्यातील कुंबळे, पालघर, दहागाव, मंडणगड, तुळशी, वेरळ, देव्हारे, पाचरळ, निगडी, पालवणी, जावळे, भिंगलोली इत्यादी गावांमध्ये पांरपरिक शाडू माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकामाला वेग आला आहे. मूर्तीसाठी लागणारे रंग, माती, साचे यांचे दर यंदाही अधिक असल्याने किंमतीत वाढ होणार आहे. उत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरातही यंदा वाढ आहे. सणावर महागाईचे संकट असले तरी भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. अष्टमीपासून मूर्तीची मागणी वाढते. पांरपरिक ऑर्डरबरोबरच नव्या मूर्तींनाही मागणी वाढते. त्यामुळे पेणच्या मूर्तीही बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असतात. आयत्यावेळी उत्सवाचे नियोजन करणाऱ्यांसाठी बाजारात रेडिमेड मूर्तीचा पर्यायही गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झाला आहे. सध्या मूर्तिकारांचे अंतिम सजावटीचे काम सर्वच ठिकाणी अगदी युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या ऑर्डर पूर्ण करता करता नवी मागणीही अनेकांना पूर्ण करावी लागत आहे.
---------
रविवारसह सुटी दिवशी बुकींग
तालुक्यातील प्रत्येक मूर्तीशाळेला रविवारसह सार्वजनिक सुटी दिवशी लहान मुले आपल्या पाल्यांसोबत भेट देत आहेत. मुलांच्या पसंतीचाच बप्पाचे घरी आगमन व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे. त्यामुळे मूर्ती बुकींगमध्ये मुलांच्या पसंतीला पालकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पहावसाय मिळत आहे. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणारे चाकरमानी हे फोनवरून मूर्तिकारांकडे बुकींग करत आहेत.
--------
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com