येथील महाविद्यालयांना मनसेचे निवेदन

येथील महाविद्यालयांना मनसेचे निवेदन
Published on

- rat२६p३७.jpg
२४N०७२४४
ःलांजा - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने लांजा हायस्कूल, वरिष्ठ महाविद्यालयांना निवेदन देण्यात आले.

लांजा येथील महाविद्यालयांना ‘मनसे’चे निवेदन

विद्यार्थींनीच्या सुरक्षीततेची काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २७ ः बदलापूर येथील मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने शहरातील हायस्कूल, कनिष्ठ व‌ वरिष्ठ महाविद्यालय व‌ ज्ञानेश्वर विद्यामंदिर या प्रशालांना निवेदन सादर करून अशा घटनेची पुनरावृत्ती आपल्या इथे घडू नये, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली.
मनसेच्यावतीने शहरातील लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लांजा वरिष्ठ महाविद्यालय त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर विद्यामंदिर या ३ प्रशालेतील संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक यांची भेट घेतली. बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने संस्था पदाधिकारी, प्रशाला यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची महाविद्यालयात बौद्धिक क्षमता, विचार तपासणी, स्वभाव, वागणूक याची सर्व तपासणी करणे गरजेचे आहे. हा प्रसंग आपल्या प्रशालेत कदापी घडू नये या दृष्टीने खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, हे निवेदन देण्यात आले. जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे लांजा तालुकाध्यक्ष संकेत कोलते, तालुकाध्यक्ष मनोज देवरूखकर, लांजा शहराध्यक्ष दिलीप लांजेकर तसेच संतोष गावडे, बाबू पाटील, दर्शन साळवी, शुभम साळवी, साहिल धामणकर, सागर मेस्त्री आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
----------
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com