वरचापाट रस्त्याची दुरवस्था

वरचापाट रस्त्याची दुरवस्था

Published on

rat२७p१२.jpg -
P२४N०७२७२
गुहागर ः वरचापाट आरे पुलाविषयी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर व शहरप्रमुख नीलेश मोरे.

गुहागर वरचापाट रस्त्याची दुरवस्था

पालकमंत्र्यांना साकडे ; निधी देण्याचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची खडी आणि दगड वर आले आहेत. त्यामुळे अपघाताची भिती आहे. वाहने चालवतानाही चालकांना कसरत करावी लागते. याबाबत गुहागर शहर शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर आणि शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन या रस्त्याच्या दुरूस्तीला निधी द्या, अशी मागणी केली तसेच गणपतीपूर्वी खड्डे दुरूस्त करा, असेही सांगितले.
गुहागर बाजारपेठेपासून सुरू होणारा गुहागर-वेलदूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते; परंतु, मलमपट्टीप्रमाणे काही दिवसातच खड्डे पुन्हा दिसू लागले. या भागात दुचाकीस्वारांचे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामध्ये एक मयत तर काहीजण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचवताना एकाच बाजूने मार्गक्रमण करताना वाहनचालकांची विशेषत: दुचाकीचालकांची तारांबळ उडते. या ठिकाणी रिक्षाला अपघात झालेले आहेत. काहीवेळा तर या अपघातांमुळे चालक यांच्यामध्ये हाणामारी किंवा वादावादीचे प्रसंगही घडलेले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या वेळी शिवसेना विभागप्रमुख संदीप भोसले उपास्थित होते.

---
कोट

गुहागर शहरात प्रामुख्याने रिक्षा व्यवसाय हा जास्त प्रमाणत गुहागर-वरचापाट-बाग-आरेगाव असा असल्यामुळे रिक्षा व्यवसाय करणे या रस्त्यामुळे अवघड झाले आहे. रिक्षांची दुरूस्ती करणेही खर्चिक होत आहे. या मार्गांवरून प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे.
- नीलेश मोरे, शहरप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com