

देवरूखवासियांना लवकरच स्वच्छ पाणी
आमदार शेखर निकम ः नागरिकांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २७ : देवरूख शहरासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ५२ कोटींची जी पाणी योजना आणली आहे तिला प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल आणि देवरूखला स्वच्छ पाणी देण्याचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
देवरूख आंबेडकर नगरमधील लोकांशी आमदार निकम यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ग्रामस्थांच्यावतीने जी कामे प्रस्थापित केली होती. ती आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामेही मार्गी लागतील. देवरूखच्या विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपल्या आंबेडकर नगरमधील जी कामे तातडीने होणे आवश्यक होती ती मार्गी लागली आहेत. आंबेडकर नगरमधून प्रचाराची सुरवात करत आहे. काही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठवल्या जातील किंवा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या विरोधात मांडली जाईल तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष न देता तुम्ही २०१४ आणि २०१९ ला माझ्यासोबत होतात किंबहुना त्यापेक्षा जास्त ताकदीने माझ्यासोबत राहावे.
या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, हनीफ हरचिरकर, शहराध्यक्ष पंकज कुसाळकर, प्रफुल्ल भुवड, राजन मोहिरे, बाळा पंदेरे, नितीन भोसले, मुराद आंबेडकर, बंडू जाधव, अमित जाधव, अनंत जाधव, बाळू गोनकर, रवींद्र लाड, संजय मापुस्कर, देवरूख शहराचे माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या भेटीदरम्यान उपस्थित होते.
--------
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.