पुरवठा साखळी व्यवस्थापन

पुरवठा साखळी व्यवस्थापन
Published on

(उद्योग साकारताना ......लोगो)

(२१ ऑगस्ट टुडे ३)

rat२७p१३.jpg
२४N०७२८२
- प्रसाद जोग
व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करताना प्रत्येक उद्योजकाला विविध संकल्पना किंवा उद्योजकीय व्यवस्था यांचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासामुळे एखादी संकल्पना दृढ होण्यास मदत होते किंवा स्वतःच्या उद्योग व्यवसायात त्या व्यवस्थेचे अंमलीकरण करणे उद्योजकाला सोपे होते. मूलतः व्यवस्थापन हे एक शास्त्र असून, ते उद्योजकाला स्वतःचा उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यवस्था कशा निर्माण करायच्या किंवा असणाऱ्या व्यवस्था व्यवस्थितपणे समजून घेऊन त्या कशा उपयोगात आणायच्या, याची शास्त्रीय माहिती देत असते. सामान्यपणे व्यवस्था म्हणजे सगळ्या गोष्टींची क्रमबद्ध साखळी, असे म्हणता येते.

- प्रसाद जोग
theworldneedit@gmail.com
--------
पुरवठा साखळी व्यवस्थापन

साखळीमध्ये जसा प्रत्येक घटक किंवा प्रत्येक दुवा हा महत्वाची कामगिरी बजावत असतो त्याचप्रमाणे उद्योजकाला आस्थापनेत उत्पादन तयार करण्यापासून ते उत्पादन बाजारपेठेत विक्रीला नेण्यापर्यंत विविध दुव्यांचे सक्षमीकरण करावे लागते तर काही प्रसंगी जर दुवे कच्चे असतील तर ते बदलावेदेखील लागतात. उद्योजक हा जर उत्तम व्यवस्थापक असला तर सर्वात आधी तो गरजांचे पृथक्करण करून त्या गरजांची पूर्ती होण्यासाठी काय काय आवश्यक आहे याचा आढावा घेतो. बाजारपेठेतील सध्याच्या ग्राहकांच्या किंवा संभाव्य ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या गरजांची पूर्ती होण्याच्यादृष्टीने एक उत्पादक किंवा एक सेवा पुरवठादार म्हणून किती सहजतेने मालाचा अथवा सेवेचा सातत्यपूर्ण, विनाखंडित पुरवठा करता येऊ शकेल याचे आरेखन किंवा नियोजन करतो. पुरवठा साखळी व्यवस्थापन ही संकल्पना तीन टप्प्यांमध्ये मांडली आहे.

पुरवठा : पुरवठा म्हणजे एखाद्या गोष्टीची, सेवेची मागणीनुसार किंवा भविष्यातील संभाव्य मागणी लक्षात घेऊन सुसूत्रितपणे व अत्यंत नियोजनात्मक पद्धतीने करून दिली गेलेली उपलब्धता होय. साधारणपणे पुरवण्याची निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे पुरवठा असे म्हणता येईल. मालाचा, सेवेचा, पैशांचा, माहितीचा, सुयोग्य मनुष्यबळाचा, वाहतुकीच्या साधनांचा, पुरवठा करण्याची स्वतंत्र व्यवस्था असू शकते. पुरवठा करताना विविध टप्प्यांमधून पुरवठादार पुरवण्याच्या प्रक्रियेचे चक्र पूर्णत्वास देण्याचा प्रयत्न करत असतो. व्यावसायिक शिस्त, वचनबद्धता व आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचलेच पाहिजे किंवा त्यांना ते त्यांच्या जवळच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेच पाहिजे, या विचारांनी प्रेरित होऊन आपली पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याच्यादृष्टीने उद्योजक मुख्य पुरवठादार म्हणून पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या तत्त्वाचा अवलंब आपल्या उद्योगात करून घेत असतो.

वितरण ः वितरण व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा भाग पुरवठा साखळीचे गुणवत्ता वाढवण्याच्यादृष्टीने निर्धारक ठरत असतो. उद्योजकाला उत्पादन बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळवण्यापासून तो आस्थापनेत योग्य वेळेत आणून त्यावर प्रक्रिया करून ठरलेल्या वेळेत वितरकांकडे सुपूर्द करण्यासाठी योग्य वाहतूक पर्यायांची निवड करावी लागते. वाहतुकीच्या साधनांच्या कार्यक्षमतेचा किंवा त्यांच्या उपलब्धतेचाही परिणाम पुरवठा साखळीच्या प्रक्रियेत होऊ शकतो.
साखळी ः साखळी म्हणजे विविध व्यक्तींची अथवा आस्थापनांची विक्री करण्याच्यादृष्टीने केलेली व्यावहारिक रचना किंवा शृंखला असे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ही साखळी समजून घेण्यासाठी आपल्याला विविध संकल्पना समजून घ्याव्या लागणार आहेत. त्या म्हणजे सुपर स्टॉकिस्ट : सुपर स्टॉकिस्ट उद्योजकांकडून म्हणजेच कंपनीकडून थेट माल खरेदी करून आपल्या स्टॉकिस्टसना किंवा सबस्टॉकिसना विकतात व आपली व्यापारी व्यवस्था बळकट करतात. यांना उत्पादकांचा माल ठेवण्यासाठी वखार किंवा गोदामांची गरज भासत असते.
साठवणूकदार : स्टॉकिस्ट म्हणजे ग्राहकांचा कल पाहून विशिष्ट मालाच्या मागणीनुसार त्या मालाच्या विक्रीसाठी त्यांचा भरपूर साठा करून ठेवणारे व्यापारी किंवा व्यापारी आस्थापना.
वितरक : डिस्ट्रिब्यूटर म्हणजे मराठीत वितरक होय. जो वितरण करतो तो वितरक असा या शब्दाचा अर्थ होतो. उत्पादक आणि घाऊक विक्रेते यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणजे वितरक होत. वितरकाकडे स्वतःची वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे असते ज्यामुळे स्थानिक पातळीवर वितरण प्रणालीमध्ये अडचणी उद्भवत नाहीत.
होलसेलर : होलसेलर म्हणजेच घाऊक विक्रेता किंवा ठोस विक्रेता जो आपल्याकडील माल किरकोळ विक्रेत्यांना देऊन स्वतःचा व्यवसाय करत असतो.
रिटेलर : रिटेलर म्हणजे किरकोळ व्यापारी किंवा किरकोळ विक्रेते होत. ग्राहकांना बाजारपेठेत आपल्या दुकानांच्या माध्यमातून माल विकणारी व्यक्ती म्हणजे किरकोळ विक्रेते होत.
हॉकर्स : काही किरकोळ विक्रेते फेरीवाल्यांप्रमाणे ग्राहकांच्या अधिक जवळ जाऊन किंवा ग्राहकांच्या उपलब्धतेच्या कक्षेत राहून आपला माल थेट ग्राहकांना विकत असतात.
एजंट : यालाच प्रतिनिधी असे म्हणतात.
सेवा उत्पादन विक्रीसाठी दुसऱ्या आस्थापनेचे काम करणारा प्रतिनिधी लागत असतो. हा प्रतिनिधी सेवा वितरणाचे कामही करत असतो.
रॉ मटेरियल सप्लायर : कच्चा माल पुरवठादारांना रॉ मटेरियल सप्लायर म्हणतात. उत्पादनासाठी उद्योजकाला विविध प्रकारचा कच्चा माल लागत असतो. हा कच्चा माल योग्य किमतीत मिळवून त्याची साठवणूक करावी लागते यासाठी विश्वासू व योग्य दर देणारे पुरवठादार निवडणे उद्योजकाच्यादृष्टीने गरजेचे असते.
यंत्रसामुग्री पुरवठादार : उद्योजकाला आस्थापनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व विशिष्ट उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असणारी यंत्रसामग्री पुरवठादारांकडून घ्यावी लागते
व्यवस्थापन : उद्योग छोटा असेल तर त्यामध्ये पुरवठा साखळीचे दुवे कमी असू शकतात; पण त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापन तत्त्वे ही वापरावीच लागतात. पुरवठा साखळीचे व्यवस्थापन करणे हा व्यवस्थापन कौशल्याचाच महत्वाचा भाग आहे. व्यवस्थापनाची स्वतःची अशी काही तत्त्वे असतात. ती तत्त्वे उद्योजकांनी शिकून घेतल्यास त्यांना उद्योजकीय क्रियाकलाप करणे सोपे होते. कामांची विभागणी, अधिकार आणि जबाबदारी यांची वाटणी, दैनंदिन कामांमध्ये अपेक्षित असलेले शिस्तपालन, व्यवस्थापकीय क्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक तत्त्वे देणारे व्यवस्थापकांचे मार्गदर्शन, सूचनांचे निर्गमन, ज्येष्ठतेनुसार किंवा जबाबदारीच्या निकषानुसार साखळीमधील दुवे व त्यांचे बळकटीकरण पुढाकार घेऊन उद्योजकांना करावेच लागते.
- महत्वाची उद्दिष्टे :
१. पुरवठा साखळीतील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करणे.
२. अनिश्चितता, अतिअवलंबित्वता कमी करणे.
३. वाहतुकीच्या साधनांवर, कुरिअरवर होणारा वारेमाप खर्च कमी करणे.
४. पुरवठा साखळीतील प्रत्येक दुव्याचा किंवा घटकाचा वेळ वाचून त्याची कार्यक्षमता कशी वाढेल याचा आढावा घेणे.
५. वितरण व्यवस्थापनामधील पारदर्शकता वाढवून पुरवठा साखळीची गुणवत्ता वाढवणे.
६. पुरवठा शृंखलेतील प्रत्येक घटकाला, व्यक्तीला प्रोत्साहन देणे .

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com