कुणकेश्‍वरात मंगळागौर नृत्य

कुणकेश्‍वरात मंगळागौर नृत्य

Published on

`त्रिवेणी’तील बचतगटाचे मंगळागौर नृत्य

कुणकेश्‍वर मंदिरात सादरीकरण ; तीनशे महिलांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः त्रिवेणी संघांतर्गत येणाऱ्या महिला बचतगटातील ३०० महिलांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आणि देवस्थान श्री कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. तिथे श्रीदेव कुणकेश्‍वर मंदिर आणि देवगड येथील गार्डनमध्ये मंगळागौर नृत्याचे सादरीकरण केले.
त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्यने बचतगटामध्ये महिला संघटित झाल्या आहेत. या माध्यमातून अर्थार्जनाचे उपक्रम महिलांनी राबवत स्वतःचीही आर्थिक प्रगती साधली. हे करतानाच विविध सामाजिक उपक्रमही त्यांनी हाती घेतले आहेत. या महिलांनी सिंधुदुर्ग येथे देवदर्शन दौरा केला. त्यामध्ये नवेदर, कोंडसर, भालावली, मोगरे, धाऊलवल्ली, देवाचे गोठणे, जैतापूर, दळे, कुवेशी, तुळसुंदे, मिठगवाणे, अणसुरे, दांडेवाडी, आडीवाडी आदी परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समृद्धी समितीचे सदस्य किरण सामंत यांनी या देवदर्शन दौऱ्यासाठी महिलांना साह्य केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या देवदर्शन सहलीचा प्रारंभ झाला. देवगड येथील प्रसिद्ध श्रीदेव कुणकेश्‍वर मंदिरामध्ये या महिला अन् मुलींनी मंगळागौर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या वेळी श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्धे यांनी ट्रस्टच्यावतीने तर माजी सरपंच चंद्रकांत घाडी यांनी ग्रामस्थांच्यावतीने या सर्व महिलांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. देवगड गार्डन येथेही महिलांनी मंगळागौर नृत्याचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com