अभिनेते विजय केंकरे ३१ला खेर्डीत

अभिनेते विजय केंकरे ३१ला खेर्डीत

Published on

अभिनेते विजय केंकरे ३१ ला खेर्डीत

विविध विषयांवर मार्गदर्शन ; नाट्य प्रशिक्षण शिबिरही होणार

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ : खेर्डी (ता. चिपळूण) येथे गुरूकुल महाविद्यालय आणि लिटल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्टला आयोजित कार्यक्रमाला मराठी रंगभूमीवरील शतक महोत्सवी नाटकाचे यशस्वी दिग्दर्शक अभिनेते विजय केंकरे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ते आठवणीतील सुधाताई आणि नाट्य, चित्रपट व मालिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक रंगभूमी व आपली रंगभूमी या विषयावरील तज्ज्ञ म्हणून विजय केंकरे यांची ओळख आहे. त्यांनी २५ एकांकीका, व्यावसायिक मराठी रंगभूमीवर श्रीमंत, कार्टी प्रेमात पडली, काय घडले ऐन वसंतात अर्ध्या रात्री, सुंदर मी होणार, जावई माझा भला, दिनूच्या सासूबाई राधाबाई, असामी आसामी, साष्टांग नमस्कार, पाच पांडवांचा बाप, बिघडले स्वर्गाचे दार, नांदा सौख्यभरे, ढोलताशे आदींसह मालिका-शॉर्टफिल्म, मराठी नाट्य माहितीपट, प्रायोगिक रंगभूमीवर दर्जेदार नाटके, बालनाट्ये, चित्रपट निदान, अरमान, विरूद्ध, मुंबई-पुणे-मुंबई, भाऊबली, बोक्या सातबंडे, ऋणानुबंध, हिंदी-मराठी मालिका अनेक पुरस्कारप्राप्त, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी केली असून, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् मुंबई, ललितकला केंद्र पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापिठाच्या नाट्यशास्त्र विभागात १९९५ सक्रिय असून ‘आठवणीतील सुधाताई करमरकर आणि नाट्य, चित्रपट, मालिका’ या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहेत तसेच या वेळी मोफत नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com