- ...तर वक्तृत्व जीवन बदलते
वक्तृत्व स्पर्धेचे
पारितोषिक वितरण
रत्नागिरी, ता. २७ : येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये ४२व्या (कै.) मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, परीक्षक योगेश कदम, प्रा. प्रकाश पालांडे, डॉ. शंकर जाधव, गणपत शिर्के, अभिनेते मयुरेश कोतकर उपस्थित होते. वक्तृत्व म्हणजे पोपटपंची नाही, पाठांतर नाही तर ही एक कला आहे. त्याला विचारांची जोड हवी. शब्दांचा अर्थ समजणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी वाचन हवे. वाचा पण नक्कल करू नका. स्वतःचे मत मांडा असे प्रतिपादन लेखक ज्ञानेश महाराव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

