काव्यवाचन स्पर्धेमध्ये मीनाक्षी अळवणी प्रथम

काव्यवाचन स्पर्धेमध्ये मीनाक्षी अळवणी प्रथम

Published on

07309

काव्यवाचन स्पर्धेमध्ये
मीनाक्षी अळवणी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. २५) आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या (कै.) विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील मीनाक्षी अळवणी हिने प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी येथील अक्षय कानविंदे याने द्वितीय तर वेंगुर्लेतील प्राजक्ता वेंगुर्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी योगिता शेटकर (सावंतवाडी) आणि माया गवस (झोळंबे) यांची निवड करण्यात आली. येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात ही स्पर्धा पार पडली. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए बुवा, उपाध्यक्ष उषा परब, सचिव प्रा. सुरेश मुकण्णावर, कोषाध्यक्ष भरत गावडे, प्रमुख पाहुणे कवी अरुण नाईक, परीक्षक स्नेहा फणसळकर, किशोर वालावलकर, विठ्ठल कदम, श्रीया भागवत, प्रा. सुषमा मांजरेकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, अॅड. नकुल पार्सेकर, मनोहर परब, कृष्णा गावडे, विजय गावडे, संगीता सोनटक्के, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, बाळकृष्ण राणे, सूर्यकांत सांगेलकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात प्रथम तीन क्रमांकांसह उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक तर स्पर्धेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक कवीला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कविता ‘आरती’ मासिकातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक उषा परब यांनी, सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. आभार भरत गावडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com