मासिक पाळी व्यवस्थापनाचे
कुडाळात विद्यार्थिनींना धडे

मासिक पाळी व्यवस्थापनाचे कुडाळात विद्यार्थिनींना धडे

Published on

07310

मासिक पाळी व्यवस्थापनाचे
कुडाळात विद्यार्थिनींना धडे

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः क.म.शि.प्र. मंडळ संचलित येथील इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ येथे उत्कर्षाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी ‘मासिक पाळीचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. भैरवी गोसावी यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तुमची सगळी गुपिते, समस्या आईला सांगा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. गोसावी यांनी मासिक पाळीदरम्यान कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली. मासिक पाळीत होणारा त्रास कमी होण्यासाठी योगाचा अंतर्भाव असावा, तुमच्या सर्व गोष्टी आईला सांगाव्यात, असे त्यांनी सांगितले. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श कसा ओळखावा, याचे मार्गदर्शन केले. स्वतःची शारीरिक व मानसिक काळजी घेणे भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील किती महत्त्वाचे आहे, याची माहिती त्यांनी मुलींना दिली. किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख, प्रशालेच्या महिला शिक्षिका तसेच महिला पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली शेट्टी यांनी केले. पूर्वा राऊळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com