छत्रपतींच्या पुतळ्याला कणकवलीत दुग्धाभिषेक
07327
छत्रपतींच्या पुतळ्याला
कणकवलीत दुग्धाभिषेक
ठाकरे गटाचे सरकारविरोधात आंदोलन
कणकवली, ता.२७ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आज शिवसेना ठाकरे गटाकडून भर पावसात दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. तसेच ‘‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’’च्या घोषणा देत छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. दुग्धाभिषेक कार्यक्रमावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तेजस राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सुदाम तेली, सी. आर. चव्हाण, राजू राठोड, प्रसाद अंधारी, मंगेश सावंत, महेश कोदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

