राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्रिशा मयेकरला रौप्यपदक

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्रिशा मयेकरला रौप्यपदक

Published on

-rat२७p१८.jpg-
२४N०७३२३
पावस ः ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या त्रिशा मयेकरचा गौरव करताना मान्यवर.
----------------

तायक्वांदोत त्रिशा मयेकरला रौप्यपदक

पावस, ता. २७ ः छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या ४१व्या ज्युनियर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत शिवार आंबेरे येथील त्रिशा मयेकरने ४४ किलोखालील वजनी गटामध्ये रौप्यपदक मिळवले.
रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लबची खेळाडू त्रिशाने आत्तापर्यंत आठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक व सहभाग नोंदवला आहे. तिला महिला प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना यांचे आणि राकेश आंबेकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थुळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रमोद वारीक आदींनी तिचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com