

खेडमधील ८५ गावे
पर्यावरण संवेदनशील
खेड : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये तालुक्यातील ८५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. या हरकतींचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनास सूचित केले आहे. यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
-----
‘कास्ट्राईब वाहनचालक’
अध्यक्षपदी वायदंडे
साखरपाः रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब वाहनचालक संघटनेची बैठक रत्नागिरी येथे झाली. बैठकीत नवनाथ वायदंडे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. वायदंडे हे गेली १२ वर्षे कोकण पाटबंधारेअंतर्गत विविध विभागात कार्यरत आहेत. बैठकीत जिल्हा कार्यकारिणीही घोषित करण्यात आली. यात राजन मिशाळे हे उपाध्यक्ष, अशोक चव्हाण यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून विजय विसापुरे, संतोष कदम, गजानन सावंत यांनी सहकार्य केले. संघटनावाढीसाठी तसेच संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा मानस वायदंडे यांनी व्यक्त केला आहे.
--------
बहिरवली येथे
बिबट्याचा वावर
खेड : तालुक्यातील बहिरवली नं.१ येथे भक्ष्याच्या शोधात शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात पोहचून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्या अन्यत्र पसार झाला. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत वनविभागाने सूचित केले आहे. मुक्या प्राण्यांना बाहेर न सोडता सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन वनपाल सुरेश उपरे यांनी केले आहे.
-------
११४ ग्रामपंचायतींना
पावणेदोन कोटी निधी
खेड : १५व्या वित्त आयोगांतर्गत तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींना १ कोटी ७२ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गावविकास आराखड्यात समावेश असलेल्या कामांसाठी निधीचा वापर ११४ ग्रामपंचायतींसाठी १ कोटी खर्च केला जाणार आहे. १५व्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाकडून बंधित व अबंधित स्वरूपाचा निधी मंजूर केला जातो. या निधीतील ८० टक्के थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ७२ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून ग्रामपंचायतींनी गावातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावून पायाभूत सुविधा पूरक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.