संगमेश्वर-कोल्हापुरातील भाविक अडकले मार्लेश्वरमधील दत्तगुरू मठात

संगमेश्वर-कोल्हापुरातील भाविक अडकले मार्लेश्वरमधील दत्तगुरू मठात
Published on

07338

कोल्हापुरातील भाविक अडकले
मार्लेश्वरमधील दत्तगुरू मठात
यंत्रणेची धावपळ; मध्यरात्री प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी कार्यवाही
सकाळी वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ः मार्लेश्वर देवस्थान येथील दत्तगुरू मठात भाविक अडकल्याचा मेसेज संगमेश्वर तालुक्यातील शासकीय यंत्रणेला मिळाला अन् या भाविकांना वाचवण्यासाठी रविवारी मध्यरात्री पोलिस व आपत्कालीन यंत्रणा थेट मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पोहोचली. या भाविकांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने चर्चेला ऊत आला होता. सोमवारी सकाळी हे भाविक सुखरूप असल्याचा संदेश शासकीय यंत्रणेला मिळाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला; मात्र या घटनेमुळे शासकीय यंत्रणेची झोप उडाली होती.
मार्लेश्वर देवस्थाननजीक नदीपलीकडे दत्तगुरू मठ आहे. गगननिरी महाराजांचे शिष्य पवनगिरी चव्हाण यांनी हा मठ उभारला असून, ते ४० वर्षे वास्तव्यालादेखील होते. वयोमानामुळे ते कोल्हापूर येथे वास्तव्याला असतात; मात्र या ठिकाणी श्रावण, दसरा, महाशिवरात्र, मकर संक्रांतीला येतात. गुरूवारी पवनगिरी चव्हाण महाराज व अन्य सात भाविक या मठामध्ये गेले होते. हा दत्तमठ नदीच्या पलीकडे आहे. पवनगिरी चव्हाण महाराज व भाविक ज्या वेळी मठात गेले त्या वेळी पाऊस नव्हता. यानंतर पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे त्यांना नदीपार करून येणे शक्य झाले नाही.
रविवारी रात्री चव्हाण महाराज यांचे पुणे येथील शिंदे नामक शिष्य यांनी कोकण आयुक्तांना संपर्क करून मार्लेश्वर येथील दत्तगुरू मठात गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याचे सूचित केले. यानंतर मात्र सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. मध्यरात्री २ वाजता देवरूखचे पोलिस, तहसील कार्यालयाचे अधिकारी, राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते घटनास्थळी रवाना झाले. बॅटरीच्या साहाय्याने शोध घेण्यात आला. आवाजदेखील देण्यात आला; मात्र पलीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बचावमोहीम थांबवण्यात आली.
----
चौकट
आवश्यक साधनसामुग्री सुपूर्द पोचवली
शासकीय यंत्रणेचे अधिकारी सोमवारी सकाळी पुन्हा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री गेल्याने हे भाविक सुखरूप असल्याचे समजले. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत नदी ओलांडून येऊ नका, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. त्यांना आवश्यक साधनसामुग्री सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसपाटील देवदास सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com