दोषींवर कारवाई होणारच

दोषींवर कारवाई होणारच
Published on

07342

दोषींवर कडक कारवाई होणारच

नीलेश राणे ः राजकोट किल्ल्याची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, ही मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. छत्रपती शिवराय आम्हा सर्वांचे दैवत आहेत. यातील जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे; मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल, असे भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी किल्ले राजकोट येथे स्पष्ट केले.
येथील राजकोट किल्ल्यातील नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजप नेते नीलेश राणे यांनी किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, पंकज सादये, राकेश सावंत, ललित चव्हाण, आशिष हडकर, निषय पालेकर, अखिलेश शिंदे आदी उपस्थित होते. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, ‘‘शिवपुतळा कोसळण्याची घटना घडायला नको होती. जे घडले ते राग येण्यासारखेच आहे. जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यातून जे काही घडले, ती रागातून आलेली प्रतिक्रिया होती, त्यात काही गैर नाही. शिवप्रेमींच्या भावना मी समजू शकतो. संयम दाखविण्यासारखी ही घटना नाही, तरीही शिवप्रेमी जनतेने जो संयम दाखविला, त्यासाठी त्यांचे आभारी आहोत. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी आमचाही पाठपुरावा सुरूच राहील.’’
---
आताचे स्मारक भव्यदिव असेल
कुडाळ ः किल्ले राजकोट येथील स्मारक हे पूर्वीपेक्षाही भव्यदिव्य आणि महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे असेल, अशी माहिती माजी खासदार राणे यांनी दिली. मालवण-राजकोट येथील दुर्घटना ही अतिशय गंभीर व वेदनादायक घटना आहे, असेही ते म्हणाले. ‘‘शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी आज याबाबत चर्चा झाली. गांभीर्यता लक्षात घेता तातडीने या भव्यदिव्य स्मारकाच्या उभारणीसाठी सरकार युद्धपातळीवर काम करणार आहे. एक एकत्रित बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच संपूर्ण देशाची, राज्याची शान अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले राजकोट येथील स्मारक हे पूर्वीपेक्षाही भव्यदिव्य आणि महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेल,’’ असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com