बॅडमिंटन स्पर्धेत ७० खेळाडूंचा सहभाग

बॅडमिंटन स्पर्धेत ७० खेळाडूंचा सहभाग

Published on

बॅटमिंटन स्पर्धेमध्ये
७० खेळाडूंचा सहभाग

राजापूर ः तालुक्यातील विखारेगोठणे येथील रयत शिक्षणसंस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय बॅटमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये १४ ते १९ वयोगटातील नॅशनल इंग्लिश स्कूल, वडवली हायस्कूल, नाटे नगर विद्यामंदिर, राजापूर हायस्कूल, निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये, नवजीवन हायस्कूल, राजापूर हायस्कूल आदी शाळांमधील ७० शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम हराळे यांच्या हस्ते झालेल्या उद्‍घाटन सोहळ्याला डॉ. संजय मेस्त्री, प्रा. विजय देवकर, प्रा. डॉ. गरव पवार, क्रीडाशिक्षक मुकेश नाचरे आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
..............

‘राजंगा फार्मर’ कंपनीची
उद्या सर्वसाधारण सभा

राजापूर ः राजंगा फार्मर प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी (ता. २९) सकाळी ११.३० वा. कार्यालयात होणार आहे. या वेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे, २०२२-२३ वर्षाची लेखा परीक्षणाची पूर्तता करणे, २०२३-२४ वर्षीच्या लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे, कंपनी उपक्रम व पुढील नियोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे, शेअर सर्टिफिकेट वितरण, लेखापाल नियुक्ती आदी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. या वेळी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश जानस्कर यांनी केले आहे.
.........

रायपाटण येथे इकोफ्रेंडली
घरगुती गणेश सजावट स्पर्धा

राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील जागृत सेवा मंडळ गांगणवाडीच्यावतीने भव्य इकोफ्रेंडली घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला ७ हजार ७७७ रु., द्वितीय क्रमांकाला ५ हजार ५५५ रु. आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करण्यात येणार असून, नावनोंदणीसह स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी सुधीर गांगण, जितू गांगण, प्रवीण गांगण, कुणाल गांगण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

--------

किरबेट केंद्रशाळेत
इंटरनेट सुविधा

साखरपा ः किरबेट, देवडे भोवडे ही गावे अतिदुर्गम म्हणून ओळखली जातात. इथे इंटरनेट सुविधा नसल्याने शाळा तसेच ग्रामस्थांच्या ऑनलाइन कामांची मोठी पंचाईत होते. त्यावर तोडगा म्हणून शाळेच्या आवारात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. किरबेट शाळा नं. १च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन अंकुशराव आणि मुख्याध्यापिका अरूणा सावंत यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात नेटवर्क बूस्टर बसवण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात जिओ, एअरटेल, आयडिया आणि बीएसएनएल यांची रेंज आणि नेट उपलब्ध झाली आहे. बूस्टरसाठी टॉवर उभारणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, अमृत महोत्सव कमिटी, उपशिक्षक ज्ञानेश्वर मगदुम, शिक्षिका सुवर्णा पाटील, हर्षाराणी धसाडे, पालक, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com