रावराणेंनी उमेदवारी मिळते का पहावे
07391
रावराणेंनी उमेदवारी मिळते
का पहावे ः संदीप साटम
...तर अनामत रक्कम जप्त करू
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः आमदार नीतेश राणे यांचे राजकीय वजन असल्यानेच मतदारसंघात विकासकामे करीत आहेत. ठाकरे गट शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी त्यांच्या पक्षाकडून आधी विधानसभेची उमेदवारी मिळते का? हे पहावे. श्री. राणेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करू; अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान भाजपच्या संदीप साटम यांनी दिले.
श्री. रावराणे यांनी भाजपसह आमदार राणे यांच्यावर सोमवारी टीका केली होती. त्याला येथील आमदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन श्री. साटम यांनी आज प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजप देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेटये, संतोष किंजवडेकर, प्रियांका साळसकर, शरद ठुकरूल, योगेश पाटकर, दयानंद पाटील आदी उपस्थित होते. श्री. साटम म्हणाले, ‘‘रावराणे यांनी टीका करण्यापेक्षा स्वतःकडे पहावे. महायुती सरकारच्या काळात महिलांसाठी विविध योजना आणल्या गेल्या. महिलांना एसटी प्रवास सवलत, शालेय विद्यार्थिनींना सवलत आदी सोयी दिल्या. मात्र, कोरोना काळात मुख्यमंत्री राहिलेल्या उध्दव ठाकरे कितीवेळा मंत्रालयात गेले होते? त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले होते. आमदार श्री. राणे यांच्या प्रयत्नातून शिक्षक आणि आरोग्य विभागाला झुकते माप देत येथे कर्मचारी भरती केली. त्यांचे राजकीय वजन असल्यानेच त्यांनी विकास केला. मात्र, रावराणे यांनी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळते का पहावे? विधानसभा निवडणूक रिंगणात उतरल्यास त्यांची अनामत जप्त केल्याशिवाय राहणार नाही; अन्यथा राजकीय संन्यास घेऊ.’’
...........................
राजिनामा मागणे चुकीचे
राजकोट (ता.मालवण) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी असून मनाला वेदना देणारी आहे. मात्र, यावरून विरोधकांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे श्री. साटम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

