‘लिलाविश’ गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी
07398
‘लिलाविश’ गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी
शोभराज शेर्लेकर ः कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्ती वितरण
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ : मातृ-पितृ, गुरू आणि समाजऋणात आपण सतत वावरत असतो. यापैकी कोणत्याही ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. शैक्षणिक वाटचालीत लिलाविश फाउंडेशन तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात केले.
लिलाविश फाउंडेशनच्यावतीने प्रशालेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात येते. या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. शेर्लेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे होते. व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर, पदाधिकारी रवींद्र पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, स्थानिक व्यवस्था समिती पदाधिकारी रवींद्र पाताडे, लिलाविश फाउंडेशनचे प्रतिनिधी बबन नारकर, पदाधिकारी दीपक गायकवाड, मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, ओझरम सरपंच प्रशांत राणे आदी उपस्थित होते.
कुडतरकर, कासार्डेकर, नारकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाताडे म्हणाले की, ‘‘कासार्डे विद्यालयात गेली अनेक वर्षे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करणाऱ्या नारकर बंधूंचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचे पैसे शैक्षणिक उन्नतीसाठी खर्च करावे. सामाजिक बांधिलकी राखत पुढे ‘लिलाविश’प्रमाणेच कार्य करा.’’ प्रशालेतील ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. मुख्याध्यापिका बिसुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. व्ही. राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक राणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

