अवैध दारु, अंमली पदार्थ विक्रीत वाढ

अवैध दारु, अंमली पदार्थ विक्रीत वाढ
Published on

07399

अवैध दारू, अमली पदार्थ विक्रीत वाढ

सुशांत नाईक ः देवगडमध्ये शुक्रवारी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः तालुक्यात अवैध दारू आणि अमली पदार्थ विक्री बोकाळली आहे. यामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहे. याबाबत पोलिस यंत्रणेला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (ता.३०) येथील पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला.
येथील संपर्क कार्यालयात श्री. नाईक माध्यमांशी बोलत होते. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडीप्रमुख हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले, ‘‘तालुक्यात अवैध दारू विक्री आणि अमली पदार्थ विक्री होत असल्याकडे युवासेनेतर्फे येथील पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत स्थानिक पोलिसांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. अवैध दारू आणि अमली पदार्थांमुळे युवापिढी व्यवसनाधीनतेकडे वळण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके असताना अवैध दारू आणि अमली पदार्थ येथे पोहचतात कसे? हा प्रश्‍न आहे. स्थानिक सुरक्षा यंत्रणा झोपलीय का? अवैध दारू आणि अमली पदार्थ या विरोधात आंदोलन करावे लागणे, ही दुर्दैवी बाब आहे. यामुळे कुटुंबे उद्‌ध्वस्त होत असून, पिढी बाद होण्याची लक्षणे आहेत. यातूनच यंत्रणेला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (ता.३०) येथील पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडू. या आंदोलनात कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिक जनता आणि महिलांनी सहभागी व्हावे. जोपर्यंत पोलिस प्रशासन अवैध दारू आणि अमली पदार्थ विक्री याविरोधात ठोस कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत वारंवार आंदोलने करण्यात येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com