सुदृढ बालक स्पर्धेत 
दर्श चोडणकर द्वितीय

सुदृढ बालक स्पर्धेत दर्श चोडणकर द्वितीय

Published on

07504

सुदृढ बालक स्पर्धेत
दर्श चोडणकर द्वितीय
सावंतवाडी ः सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मॉन्सून महोत्सवाच्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत पाच ते आठ या गटात दर्श चोडणकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्याला गौरविले.
---
चर्मकार समाजातील
बांधवांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्राच्या (एनएसएफडीसी, नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रवीण जाहीर यांनी केले आहे. ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण वित्त योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण योजना, उत्कर्ष ऋण योजना या योजनांचा लाभ घेण्यासठी अर्जदार हा चर्मकार समाजातील असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून वरील शासकीय योजनेंबाबत तीन प्रतींत अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत.
------
मासिक पाळीबाबत
विद्यार्थिनींना धडे
कुडाळ ः क.म.शि.प्र. मंडळ संचलित येथील इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ येथे उत्कर्षाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी ‘मासिक पाळीचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. भैरवी गोसावी यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तुमची सगळी गुपिते, समस्या आईला सांगा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान डॉ. गोसावी यांनी मासिक पाळीदरम्यान कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली. मासिक पाळीत होणारा त्रास कमी होण्यासाठी योगाचा अंतर्भाव असावा, तुमच्या सर्व गोष्टी आईला सांगाव्यात, असे त्यांनी सांगितले. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श कसा ओळखावा, याचे मार्गदर्शन केले. स्वतःची शारीरिक व मानसिक काळजी घेणे भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील किती महत्त्वाचे आहे, याची माहिती त्यांनी मुलींना दिली. किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख, प्रशालेच्या महिला शिक्षिका तसेच महिला पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली शेट्टी यांनी केले. पूर्वा राऊळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com