

- ratchl२७४.jpg-
KOP२४N०७४२२
चिपळूण ः जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदीप सावंत यांचा सत्कार करताना पदाधिकारी
----------------
मराठा महासंघाच्या रत्नागिरी
जिल्हाध्यक्षपदी संदीप सावंत
चिपळूण, ता. २७ ः मराठा समाजासह बहुजन समाजाचे मजबूत संघटन असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चिपळुणातील संदीप सावंत यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी पत्र देऊन सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे. सावंत गेले कित्येक वर्षे समाजकारण व राजकारणात कार्यरत आहेत. राजकारणात अनेक मोठ्या पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्यांसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांची चिपळूण व संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत महासंघाने त्यांना थेट रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. निवडीचे पत्र देताना महामुंबई सरचिटणीस महेश सावंत, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख विवेक कदम, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अविनाश राणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष धोंडू जाधव, सचिव बाळकृष्ण लाड, कोषाध्यक्ष अनंत मोरे, चिपळूण तालुका संपर्कप्रमुख किशोर घाग, मंगेश शिर्के आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.