-राष्ट्रवादीच्या त्या बॅनरची शहरात चर्चा
चिपळुणात सर्वपक्षीयांकडून बॅनरबाजी
दहीहंडी उत्सव ; विकास कामांच्या उल्लेखाची शहरात चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांनी मतदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी उत्सवांकडे मोर्चा वळवला आहे. दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप, मनसे आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. आमदार शेखर निकम यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दहिहंडीच्या निमित्ताने विकासाची हंडी या मथळ्याखाली लावलेले बॅनर शहरात चर्चेचा विषय झाले आहेत.
जुने बसस्थानक परिसरात माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बॅनर झळकत होते. या परिसरात शरद पवार गटाच्या पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. चिंचनाक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे झेंडे लावण्यात आले होते. तेथील बॅनरवर आमदार शेखर निकम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत होते. तेथून काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ चिंचनाका, शिवसेना ठाकरे गट यांच्या हंड्या बांधण्यात आल्या होत्या. जिप्सी कॉर्नर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात भाजप, मनसेची हंडी लावण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची जाहिरात होईल, असे बॅनर लावले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी बहादूरशेख नाका येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या परिसरात त्यांनी लावलेले बॅनर सर्वांच्या चर्चेचा विषय होता. विधानसभा मतदार संघात १२०० कोटीची विकासकामे आणि चिपळूण शहरात २७२ कोटींची विकासकामे करताना फिक्स या मथळ्याखाली अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने शहरात बॅनर लावले होते. काही बॅनरवर विकासाची हंडी असा मजकूर होता. चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटीच्या पाणीयोजनेचा बॅनरवर उल्लेख होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

