-मंडणगडात 525 दहीहंड्या फुटल्या

-मंडणगडात 525 दहीहंड्या फुटल्या

Published on

-rat२७p२९.jpg-
P२४N०७४१६
मंडणगड : मनोरा रचून दहीहंडी फोडताना गोविंदा.
----------
मंडणगडमध्ये गोविंदा रे गोपाळाचा गजर

जन्माष्टमी उत्सव शांततेत ; ५२५ दहीहंड्या फुटल्या
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला व गोविंदा दहीकाला उत्सव तालुक्यात शांततेत झाला. बाणकोट सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ सार्वजनिक व ३८९ खासगी दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. मंडणगड हद्दीत १२ सार्वजनिक व १२२ खासगी दहीहंडी फोडण्यात आल्या. गावागावातील गोविंदांनी गोविंदा गोपाळाच्या जयघोषात हंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी भक्तीमय वातावरणात कार्यक्रम झाले.
मंडणगड शहरात युवासेना, शहर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून सार्वजनिक दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. या निमित्ताने डीजे व मनोरंजनाचे कार्यक्रमही होते. शहरातील दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा सोहळा पाहण्यासाठी रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचे प्रसंग वारंवार घडत होते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना दमछाक करावी लागली. खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीही आपल्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या होत्या. लहान मुलांच्या खेळणीचेही स्टॉल जागोजागी लागले होते. एकंदरीत रात्री उशिरा पर्यंत रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com