चर्मकार समाजातील बांधवांना आवाहन

चर्मकार समाजातील 
बांधवांना आवाहन
Published on

चर्मकार समाजातील
बांधवांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्राच्या (एनएसएफडीसी, नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रवीण जाहीर यांनी केले आहे.
५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण वित्त योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण योजना, उत्कर्ष ऋण योजना या योजनांचा लाभ घेण्यासठी अर्जदार हा चर्मकार समाजातील असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून वरील शासकीय योजनेंबाबत तीन प्रतींत अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत.
-----
पुतळ्याचे अवशेष
‘फॉरेन्सिक लॅब’कडे
मालवण : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना आज या पुतळ्याच्या पाहणीसाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक नौदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत दाखल झाले. त्यांनी पुतळ्याचे काही अवशेष ताब्यात घेतले. राजकोट परिसरात आज पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी नौदलाचे अधिकारी अक्षय पाटील, सुशीलकुमार राय यांनी पाहणी केली. यावेळी फॉरेन्सिक लॅब पथकाकडून पुतळ्याचे अवशेष ताब्यात घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर या अवशेषावर ताडपत्रीचे आच्छादन पांघरले होते. त्याठिकाणीही पोलिस तैनात ठेवले होते.
...........
सावंतवाडीत आज
शिवसेनेचा मेळावा
सावंतवाडी ः येथील मतदारसंघांचा शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचा मेळावा उद्या (ता. २८) सायंकाळी ३ वाजता येथील रवींद्र मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. यावेळी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत जास्तीत जास्त अर्ज भरून मदत केलेल्या महिला भगिनींचे सत्कार, महिला स्वयंम रोजगार प्रशिक्षण घेतलेल्या २२ महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी व शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला आघाडी फुगडी संघातर्फ करमणुकीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com