गणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

गणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Published on

-rat२७p३४.jpg-
२४N०७४२८
खेड ः कशेडी बोगद्याची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
-----------

गणेशोत्सवात संबधी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

खेड, ता. २७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास कशेडी बोगद्याच्या ठिकाणी आले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे कशेडी बोगद्याला लागलेल्या गळतीबाबतदेखील विचारणा केली. बोगद्यामध्ये एकाच लेनमधून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. या वेळी महाडचे आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे आदी उपस्थित होते.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com