उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढवणार
उर्दू शिक्षक संघटना ; चांगले कार्यकरणाऱ्या शिक्षकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यात उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी संघटनेमार्फत विविध उपाय करण्याचा निर्धार अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला.
अखिल भारतीय उर्दू शिक्षकसंघाची जिल्हास्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या आरोग्य मंदिर हॉलमध्ये झाली. या प्रसंगी नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. शाळेत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांमध्ये जियाऊल्ला खान (बहादूरशेख उर्दू, ता. चिपळूण), अजीम शेख साटवली (उर्दू ता. लांजा), शराफत फकीर पिंपळी (चिपळूण) आणि वहीदा बुड्डू (शिरगांव उर्दू ता. रत्नागिरी) यांचा सन्मान करण्यात आला. या सभेचे प्रास्ताविक आणि संघटनेच्या स्थापनेपासूनचा लेखाजोखा सचिव मुनाफ गुहागरकर यांनी सादर केला. संघटनेसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष हिदायत नाईक जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षकांच्या समस्या, वारंवार जिल्हा शिक्षण विभागापासून आमदार, खासदार, मंत्री तसेच मंत्रालयापर्यंत मांडून समस्या सोडवण्यासाठी झटत असल्याचे गुहागरकर यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीत संचालक मंडळातील चुकीच्या गोष्टींना संघटना नेहमीच विरोध करेल, असे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

