बॅ. खर्डेकर महाविद्यालय 
व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेता

बॅ. खर्डेकर महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेता

Published on

07436

बॅ. खर्डेकर महाविद्यालय
व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेता
वेंगुर्ले, ता. २७ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे झाल्या. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुले गटात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय विजेता ठरला. महाविद्यालयाचा विजेता संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी देसाई-मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले, पर्यवेक्षक डी. जी. शितोळे, जिल्हा क्रीडाधिकारी सचिन रणदिवे, सुरेंद्र चव्हाण, जिमखाना चेअरमन व्ही. पी. देसाई, जे. वाय. नाईक यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू सॅमसन फर्नांडीस यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com