आरजीपीपीएलमधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती

आरजीपीपीएलमधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती

Published on

rat२७p१४.jpg -
P२४N०७३०३
आरजीपीपीएल प्रकल्प.
---------
‘आरजीपीपीएल’मधून १३०० मेगावॅट वीजनिर्मिती

प्रकल्पातील कामगारांवर अन्याय ; कपातीचे सत्र सुरूच, शासनाने लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि विजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता; परंतु, राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणीनुसार वीजनिर्मिती करत आहे. गेले काही दिवस प्रकल्पातून दोन टप्प्यात १३०० आणि ४०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे; मात्र स्थानिक कामगार कपात सुरूच आहे.
तालुक्यातील अंजनवेल या ठिकाणी उभारण्यात आलेला एन्रॉनचा दाभोळ वीजप्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्प १९९५ ला सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरला होता. सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. किफायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे. गतवर्षी केंद्र सरकारने हा प्रकल्प टिकला पाहिजे म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेतली; मात्र, या बैठकीनंतर कोणतीही कार्यवाही झालेली दिसली नाही.
-----
रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात

वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. त्यानंतर कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॅटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी, रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला.

-----
उद्योगांच्या मागणीनुसार विजनिर्मिती

महागड्या दरामुळे नवीन वीजखरेदी करार झालेला नाही. सध्या काही उद्योगांच्या मागणीनुसार, कंपनी व्यवस्थापन वीजनिर्मिती करत आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२.३० या वेळेत १३०० मेगावॅट तर रात्री १२.३० ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४०० मेगावॅट वीज तयार करून ती विकली जात आहे.
----------

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com