राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावंतवाडीत निषेध
07442
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
सावंतवाडीत निषेध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः मालवण राजकोट परिसरात उभारलेल्या अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अॅड. रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवक अध्यक्ष नईम मेमन, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तौसिफ आगा, चंद्रशेखर परब, प्रसाद परब, शिवराम सावंत, वैभव परब आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

