-देवरूखात सात थरांची सलामी

-देवरूखात सात थरांची सलामी
Published on

-rat२७p३५.jpg, rat२७p३६.jpg
P24N07466, 24N07467
- देवरूख ः दहीहंडी उत्सवात सलामी देताना गोविंदा पथक. दुसऱ्या छायाचित्रात दहीहंडी पाहण्यासाठी उपस्थित नागरिक.
--------------

देवरूखात सात थरांची सलामी

दहीहंडीचा उत्साह; बक्षिसांची लयलूट
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २७ : मानवी मनोऱ्‍यांचा थरार अनुभवत देवरूखला नागरिकांनी प्रचंड गर्दीत दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. तालुका व जिल्हाभरातून आलेल्या गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. याच जोडीला समूहनृत्य स्पर्धा व कुणाल पाटील या कलाकाराने केलेली लावणी नृत्ये खास आकर्षण ठरले. रत्नागिरी येथील मिलिंद वायंगणकर यांच्या जल्लोष लावणीचा ग्रुपने बहारदार नृत्ये पेश करून रंगत आणली. उबाठा गट शिवसेना व छोट्या गवाणकर मित्रमंडळातर्फे बांधण्यात आलेल्या दहीहंडीला गर्दी झाली होती. श्री सोळजाई गोविंदापथक, महापुरुष खालची आळी, अमृतनगर, सिद्धगिरी पूर, जयसांबा पूर, साई नवलाई आंबवली, जय हनुमान कांगणेवाडी, सांज कट्टा खालची आळी, केदारलिंग काटवली आदी गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून धमाल आणली. या वेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नेहा माने, प्रद्युन्न माने, राजेंद्र महाडी, बंड्या बोरूकर, निलम हेगशेट्ये आदी उपस्थित होते. देवरूख शहर शिवसेनेतर्फे लकी ड्रॉ मधून दहा महिलांना साड्या बक्षिसरूपात देण्यात आल्या.
संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे आमदार शेखर निकम पुरस्कृत दहीहंडी सोहळा उत्साहात झाला. बसस्थानक येथे माजी आमदार सदानंद चव्हाण, किरण सामंत, प्रमोद पवार, सचिन मांगले, प्रसाद सावंत व सहकारी यांच्या दहीहंडी सोहळ्याला रंगत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com