पान एक-''महाविकास''तर्फे आज मालवणात निषेध मोर्चा
07452
मालवण ः पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.
''महाविकास''तर्फे आज
मालवणात निषेध मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ ः पुतळा कोसळल्याची घटना शिवप्रेमींच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. याचा निषेध म्हणून शिवप्रेमी आणि महाविकास आघाडी उद्या (ता.२८) सकाळी दहा वाजता शहरात मोर्चा काढणार आहेत. यात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत, काँग्रेसचे अरविंद मोंडकर, शिल्पा खोत, यतीन खोत, नितीन वाळके, पूनम चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, ‘‘महायुतीचे सरकार नौदलाला दोषी ठरवण्याचे काम करत आहे. आपली जबाबदारी झटकून घिसाडघाई करणारे हे सरकार आहे. ज्या व्यक्तीने हा पुतळा बनविला, त्याने दोन वर्षे लागतील, असे सांगितले होते; मात्र, त्याच्याकडून सहा महिन्यांत हे निकृष्ट दर्जाचे काम करून घेतले गेले. हे काम करून घेणारे सरकार कोणाचे होते, याची चौकशी झाली पाहिजे. नौदलावर ठपका ठेवून चालणार नाही. पालकमंत्र्यांसहित जिल्हाधिकाऱ्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एवढं सगळं होऊन भाजपचा पदाधिकारी बेताल वक्तव्य करत होता. त्याची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. आज सर्वांच्या भावना दुखावल्या असताना, बेताल वक्तव्य करणाऱ्या अतुल काळसेकर यांचाही आम्ही निषेध करत आहोत. मोर्चात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे.’’
काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख म्हणाले, ‘‘घडलेली घटना ही दुर्दैवी आणि क्लेशदायी आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. शिवराय आमची अस्मिता आहे. महाराष्ट्र सरकार नौदलाला बदनाम करण्याचे काम करत आहे. पुतळा उभारताना सर्व बाबी तपासणे गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करून घ्यायला पुढे येता, तर जबाबदारी घेण्यासाठीसुद्धा पुढे यायला हवे. जी चूक झाली आहे ती महाराष्ट्र सरकारने मान्य करायला हवी आणि तमाम शिवप्रेमींची माफी मागायला हवी. उद्या होणारा मोर्चा हा शिवप्रेमींचा आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

