रत्नागिरी - तरूणीवर अत्याचार प्रकरणी एसआयटी
तरुणीवर अत्याचारप्रकरणी ‘एसआयटी’
धनंजय कुलकर्णी ः तांत्रिक, वैज्ञानिकसह सर्व अंगांनी चौकशी सुरू
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरीतील नर्सिंगच्या तरुणीवरील लैंगिक अत्याचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. यामध्ये महिला पोलिस निरीक्षकांसह आणखी दोन महिला पोलिस उपनिरीक्षक आणि इतर पोलिस आहेत. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तांत्रिक, वैज्ञानिक असा सर्व अंगांनी तपास सुरू असून, विविध पथके यावर काम करत आहेत. लवकरच तपासात काहीतरी निष्पन्न होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरीत घडलेल्या या घृणास्पद घटनेनंतर प्रचंड जनप्रक्षोभ उसळला. रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने जमाव जिल्हा रुग्णालयात होता. ‘फाशी... द्या.. आरोपीला फाशी द्या’ म्हणत जमाव जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी रस्ता रोकोही करण्यात आला. मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. अजून त्या नराधमांचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले, ‘लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्यासह अन्य दोन महिला अधिकारी यामध्ये आहेत. तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अन्य पथकेही याचा समांतर तपास करत आहेत. जबाबात पीडित मुलीने जो मार्ग दिला होता, त्या मार्गावरील ४ सीसीटीव्हींचे फुटेज आम्हाला प्राप्त झाले आहे. तपासाच्यादृष्टीने मोबाईल रेकॉर्डसह अन्य काही गोष्टी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे अतिशय संवेदनशील प्रकरण असल्याने सर्व अंगांनी आम्ही त्याची चौकशी सुरू ठेवली आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही तपासण्यांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.’
----------
चौकट
तपासणीसाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला
लैंगिक अत्याचार झालेल्या तरुणीसोबत झटापट झाली आहे. तशा जखमा अंगावर आहेत. तिची वैद्यकीय तपासणी झाली असून, काही नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. त्याचा अहवाल पुढील आठ ते दहा दिवसांत अपेक्षित आहे. त्या अहवालानंतर या साऱ्या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

