खालचापाटमध्ये नदीतील दहीहंडी ठरली आकर्षण

खालचापाटमध्ये नदीतील दहीहंडी ठरली आकर्षण

Published on

-rat२७p४३.jpg-
P२४N०७४६१
गुहागर ः नदीत बांधलेली हंडी फोडताना गोविंदा पथक.
------------

खालचापाटमधील नदीतील दहीहंडीचे आकर्षण

गुहागर, ता. २७ ः गुहागर शहरातील खालचापाट जांगळवाडी येथील नदीतील दहीहंडी आकर्षण ठरली. जांगळवाडी गोविंदा पथकानेच ही दहीहंडी फोडली. गुहागर खालचापट जांगळवाडी येथे नदी आहे. या नदीत गेले तीन वर्ष दहीहंडी बांधून फोडण्याचा उपक्रम जांगळवाडीवासिय करत आहे. दरवर्षीप्रमाणे नदीतील वाहत्या पाण्यात चार थरांची हंडी बांधण्यात आली होती. या हंडीला आकर्षक बक्षीसही लावण्यात आले होते. वाहत्या पाण्यात थर रचण्यासाठी गोविंदा पथकाला थोडे त्रासदायकच होत होते. ही चार थरांची दहीहंडी जांगळवाडी येथील गोविंदा पथकाने फोडली. ही दहीहंडी बघण्यासाठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com