ढाकु...माकुमच्या तालावर फुटल्या २५०० दहीहंड्या
rat२७p४०.jpg-
P२४N०७४४९
रत्नागिरी : एसटी बसस्थानकाजवळ हंडी फोडताना गवळीवाडा पथकाचे गोविंदा.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------
जिल्ह्यात दिवसभारात फुटल्या २५०० दहीहंड्या
पावसाची हजेरी ; गोविंदा रे गोपालाच्या ताल, जिल्ह्यातील गोविंदां पथकांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : ढाकू... माकुम, ढाकु... माकुम, गोविंदा रे गोपाला अशा गाण्यांची धूम, हंड्या बांधण्यासाठी आयोजकांची क्रेन, डीजे, स्टेज आदींच्या तयारीची दुपारपर्यंत लगबग दिसत होती. संध्याकाळी मात्र हंड्या पाहण्यासाठी ठिकठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. गोविंदा पथकांची प्रचंड वर्दळ आणि हंड्या फोडण्यासाठी थरावर थर रचत रात्री उशिरा राजकीय प्रतिष्ठेच्या हंड्यांसह जिल्ह्यातील २५१ सार्वजनिक तर २ हजार ६१२ खासगी दहीहंड्या फोडून दहिकाला उत्सहात साजरा झाला. अनेक गोविंदा पथकांनी या वेळी लाखेंच्या बक्षिसांची लयलूट केली.
थरांवर थर लावण्याचा सराव गेले महिनाभर सुरू होता. काही राजकीय नेत्यांनीदेखील स्पॉन्सर केलेले गोविंदा पथके अनेक ठिकाणी दिसत होती. ७ ते ८ थर लागतील एवढ्या उंचीवर हंड्या बांधण्यात आल्या आहेत. यंदा राजकीय कल्लोळ सुरू असल्यामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी उत्सव यावर्षी लक्षवेधी ठरला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठे स्टेज, हंडी बांधण्यासाठी आणलेल्या क्रेन, डीजे सिस्टिम आदींमुळे दहीकाल्याच्या या उत्सवात मोठी भर पडली. विविध गाण्याच्या तालावर गोविंदा थिरकत, पाण्याचा मारा सहन करत थरावर थर लावत होते. अनेक गोविंदा पथकांनी सहा ते सात थर लावत सलामी देत बक्षिसांची लयलूट केली. मानाच्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या अनेक हंड्या रात्री उशिरापर्यंत फुटल्या नव्हत्या. पावसानेही आज दहीहंडी सणाच्यादिवशी हजेरी लावल्याने गोविंदांच्या आनंदाला भरते आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

