पारंपरिक उत्साहात दहीहंडी

पारंपरिक उत्साहात दहीहंडी

Published on

-rat२७p३७.jpg-
OP२४N०७४४६
रत्नागिरी : दहीहंडीनिमित्त मंगळवारी विठ्ठल मंदिरात पहिली हंडी फोडून प्रारंभ करताना गोविंदा.
rat२७p३८.jpg-
P२४N०७४४७
रत्नागिरी : धमालनीच्या पाराजवळ चार दहिहंड्या अपूर्व उत्साहात फोडण्यात आल्या.
rat२७p३९.jpg-
२४N०७४४८
रत्नागिरी : श्री विठ्ठल मंदिर व राधाकृष्ण मंदिरातील देखण्या मूर्ती व आकर्षक सजावट.
rat२७p४१.jpg-
KOP२४N०७४५९
रत्नागिरी : विठ्ठल मंदिराच्या कन्या मेळ्यातील राधाकृष्णाच्या वेशभूषेत देखावे साकारताना बालदोस्त.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
------------

रत्नागिरीत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात

राजकीय नेतेमंडळींचा पुढाकार ; रथाची प्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : चिंब भिजवणाऱ्या पावसाच्या सरी आणि दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा जल्लोष रत्नागिरी शहरात हजारोनी अनुभवला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पारंपरिक उत्साहात पालखी व रथाची मिरवणूक, बाळकृष्ण व गोपिकांच्या वेशभूषेतील बालदोस्त आणि सर्वांना दहीपोह्यांचा प्रसाद अशा पारंपरिक उत्साहात शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर आणि राधाकृष्ण मंदिरात अपूर्व उत्साहात काल रात्री बाळकृष्णाच्या जन्मोत्सवाचे कीर्तन रंगले. आज गोपाळकाला साजरा झाला. आगामी नगरपालिका, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन इच्छुक राजकीय नेतेमंडळींनी दहीहंड्या आयोजित केल्या.
आज दुपारी बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त बाल मेळा रंगला. बाळकृष्णाच्या आणि राधेच्या वेभभूषेमध्ये असलेल्या बालदोस्तांनी धम्माल नृत्ये सादर केली. विठोबाच्या पालखीच्या भोवत्या झाल्यानंतर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळून दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर विठोबाचा रथ प्रदक्षिणेसाठी बाहेर आला. त्यानंतर शहरात दहीहंडी फोडण्यास सुरवात झाली.
विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक रितीरिवाज पाळत गोकुळाष्टमी, दहीहंडी सण साजरा होतो. गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने गोविदांचाही उत्साह पाहायला मिळाला. विठ्ठल मंदिरात सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान हंडी फोडल्यानंतर दही-पोह्यांचा प्रसाद वाटण्यात आला. विठोबाचा सजवलेला रथ आकर्षक दिसत होता. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चित्ररथ साकारण्यात आले. विठ्ठल मंदिर, धमालनीचा पार, गोखले नाका येथे तीन हंड्या फोडल्यानंतर विठोबाची पालखी राधाकृष्णाच्या मंदिरात पोहोचली. तेथेही हंडी फोडून पुढे त्यानंतर धनजी नाका, भाजीमार्केट, झारणी रोड, राम मंदिर नाका या मार्गावरील हंडी दुसऱ्या- तिसऱ्‍या थरावर फोडण्यात आला. रथ व पालखी राम आळीमार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर सारी नगरी रे, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला या जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली.
---
कोट
विठ्ठल मंदिर व राधाकृष्ण मंदिर येथे गेल्या अनेक शतकांपासून कृष्णजन्मोत्सव, मेळा आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येथे पारंपरिक उत्सव आजही टिकून राहिला असून रत्नागिरीकर आवर्जून या उत्सवात सहभागी होतात.
- राजन फाळके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com