चिपळुणात दहीहंडीचा उत्साह, पाऊस गायब

चिपळुणात दहीहंडीचा उत्साह, पाऊस गायब

Published on

-rat२७p४४.jpg
P२४N०७४६८
-पिंपळी ः येथील दहीहंडीला सलामी देताना गोविंदा पथक.
------------

चिपळुणात दहीहंडीचा उत्साह

११ राजकीय हंड्या ; सायंकाळनंतर जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : संपूर्ण तालुक्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान पावसाने दडी मारली. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये नाराजी होती. शहरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. या दहीहंड्या फोडण्यासाठी सायंकाळी उशिरा गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगली.
दहीहंडी उत्सवानिमित्त शहरात नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. कोळकेवाडी, मोरवणे, गोवळकोट, पठारवाडी, पोफळी, सावर्डे, कापसाळ येथील गोविंदा पथक शहरात उतरले होते. शिरगाव येथे व्यापारी मित्र मंडळातर्फे सकाळी हंडी बांधण्यात आली होती. शहरातील गल्लोगल्ली लहान मोठ्या दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या दुपारपर्यंत फुटल्यानंतर मोठ्या हंड्या बांधण्यास सुरवात झाली.
भाजी मंडई येथे माजी आमदार रमेश कदम मित्र मंडळ, भाजी व्यापारी संघटना यांच्यातर्फे हंडी बांधण्यात आली होती. चिंचनाक्यात आमदार शेखर निकम समर्थकांनी हंडी बांधली होती. तिथून काही अंतरावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दहीहंडी बांधण्यात आली होती. जिप्सी कॉर्नर येथे मनसे आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे भाजपकडून दहीहंडी बांधण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com