तिरुपती ब्रम्होत्सव

तिरुपती ब्रम्होत्सव

Published on

फोटो 07486

तिरुमला ब्रह्मोत्सवात
विविध सुविधा देणार
जे. श्यामल राव; चार ऑक्टोबरपासून प्रारंभ

तिरुपती, ता. २७ : तिरुमला, तिरुपती देवस्थानच्यावतीने ४ ते १२ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या श्रीवारी वार्षिक ब्रह्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. सर्वसामान्य भक्तांना सुलभ दर्शनासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार असल्याचे विशेष कार्यकारी अधिकारी जे. श्यामल राव यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘सकाळी ८ ते १0 च्या दरम्यान देवाची वाहन सेवा असेल, तर हीच सेवा संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. गरूड सेवा केवळ ७ ते ९ वाजेपर्यंत असेल. ता. ४ ऑक्टोबरला संध्याकाळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते देवाला वस्र अर्पण करण्यात येईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता, या काळातील मंदिरातील अनेक सेवा आणि विशेष दर्शन रद्द केले आहे. सुमारे सात लाख लाडूंचा बफर स्टॉक तयार ठेवला जाईल. जिल्हा पोलिसांच्या समन्वयाने कडक बंदोबस्त ठेवला जाईल. गरूड सेवेच्या दिवशी घाट रस्ते २४ तास खुले ठेवण्यात येतील आणि पोलिस सतत दक्ष राहतील. अभियांत्रिकी विभागाने तिरुमला आणि तिरुपती या दोन्ही ठिकाणी तयारी सुरू केली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करून मोठ्या डिजिटल एलईडी स्क्रीन्स उभारण्यात येणार आहेत. भक्तांसाठी अन्नदान, दूध, बाहेरील रांगेत नाश्ता वितरणाची व्यवस्था केली आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिरुमला येथील अश्विनी हॉस्पिटल आणि वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्स येथे वैद्यकीय केंद्रे आणि दवाखाने यांच्यासह अनेक प्रथमोपचार केंद्रे, मोबाईल क्लिनिक आणि रुग्णवाहिका स्थापन केल्या आहेत. चार हजार सेवक भक्तांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com