क्राईम

क्राईम
Published on

‘एर्नाकुलम एक्स्प्रेस’मध्ये
७९ हजाराची चोरी

रत्नागिरीः कोकण रेल्वेच्या एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेमधून प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या बॅगेमधील ७९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला. राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास राजापूर रेल्वेस्टेशनदरम्यान निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना चोरट्याने ते झोपी गेल्याचा फायदा घेऊन राजापूर रेल्वे स्टेशनदरम्यान त्यांच्या बॅगेमधील ६० हजाराचा लॅपटॉप, १३ हजाराचा टॅब आणि ५ हजाराचे हेडफोन, १ हजाराची पॉवरबॅंक, १०० रुपयांचा चार्जर असा ७९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी फिर्यादी प्रवाशाने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
------
तरुण मद्यपीवर गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश अरविंद आग्रे (२३) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.२५) रात्री सव्वादहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिश हा रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com