सावंतवाडीत गोविंदांचे थरांवर थर

सावंतवाडीत गोविंदांचे थरांवर थर

Published on

07506

सावंतवाडीत गोविंदांचे थरांवर थर
दहीहंडीचा थरारः ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः शहरासह तालुक्यात गावागावांत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात आयोजित १७ दहीहंडी फोडण्यास सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. अमेय तेंडुलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने शहरातील बहुतांश दहीहंडी फोडल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई, पुण्यासारख्या दहीहंडीचा थरार या ठिकाणी अनुभवता आला. दहीहंडीच्या ठिकाणी स्टेजही उभारले होते.
‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात थरांवर थर लावत सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून मुरलीधर मंदिरासमोरील मानाची दहीहंडी फोडत शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या. गोविंदांचा हा थरार ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सालईवाडा येथील श्री. पडते यांच्या निवासस्थानी विराजमान श्रीकृष्ण घेऊन प्रारंभी संस्थानकालीन मुरलीधर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह आरती करण्यात आली. यानंतर मानाची दहीहंडी फोडत श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या.
यावेळी अमेय तेंडोलकर, सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकूर, अॅड. अतुल केसरकर, बाबू कुडतरकर, दिनेश जाधव, सनी जाधव, मयुर लाखे, अरुण घाडी, संदीप केसरकर, रोहित चव्हाण, नंदू ढकरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com