

07510
पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
वैभव नाईक : पुतळा उभारणीत मोठा भ्रष्टाचार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी पुतळा उभारणी आणि सुशोभिकरणाच्या निविदा काढल्या होत्या. ही सर्व कामे निकृष्ट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज केली.
येथील विजय भवन येथे श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘शिवरायांचा पुतळा ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे चांगला ठेकेदार नेमून पुतळा उभारता आला असता. परंतु, पालकमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील आणि कोणताही अनुभव नसलेल्या एकाला पुतळा उभारणीचा ठेका दिला. तसेच कोट्यवधी रूपये खर्चूनही शिवरायांचा पुतळा पंचधातूचा केलेला नाही. अत्यंत कमी दर्जाचे साहित्य वापरून पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्यामुळे आठ महिन्यांतच पुतळा कोसळण्याची नामुष्की ओढवली आहे.’’
श्री.नाईक म्हणाले, ‘‘राजकोट येथील पुतळ्याचे नटबोल्ट गंजल्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना २३ ऑगस्टला पाठवले. याचाच अर्थ बांधकाम विभागाला पुतळ्याच्या दूरवस्थेबाबत माहिती होती. परंतु, बांधकाम विभागाने तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुतळा कोसळण्याच्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागही तेवढाच जबाबदार आहे. बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुतळा उभारणीची कंत्राटे दिली. त्यामुळे पुतळा कोसळण्याच्या घटनेत तेही तेवढेच दोषी आहेत. त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीत्रिपदाचा राजीनामा द्यावा. श्री.चव्हाण हे राजीनामा देईपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू.
---
...म्हणून ‘बांधकाम’चे कार्यालय फोडले
तळा कोसळण्याच्या संपूर्ण घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. बांधकाम विभागामार्फतच संपूर्ण पुतळा उभारणीचे काम झाले होते. या दुर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार असल्याने आपण बांधकाम विभागाचे कार्यालय फोडले. या प्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण, मला त्याची पर्वा नाही असे श्री.नाईक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.