

भंडारपुळे समुद्रात
एक बुडाला
रत्नागिरी, ता. २७ : गणपतीपुळेजवळील भंडारपुळे येथे मासे पकडण्यास गेलेला एकजण समुद्रात बुडाला. शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह उशिरा सापडला. नौशिन नजीर पेवेकर (३८, रा. मजगाव, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
आज सायंकाळी मजगाव येथील तीन-चारजण मासे पकडण्यासाठी भंडारपुळे येथे गेले होते. तेथे मासा पकडण्याच्या नादात नौशिन पेवेकर तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही आणि त्यात नौशिन बुडाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर समुद्रात शोध घेण्यात आला. घटना घडल्यानंतर दोन तासांनी नौशिन यांचा शोध लागला. या घटनेबद्दल तातडीने पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.