‘गीत गायन’मध्ये उर्मी, सुजाता अव्वल

‘गीत गायन’मध्ये उर्मी, सुजाता अव्वल
Published on

08081

‘गीत गायन’मध्ये उर्मी, सुजाता अव्वल

कट्टा येथील स्पर्धा; बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने (कै.) वामनराव काराणे स्मृती संगीत विद्यालयाच्यावतीने पहिली ते चौथी एक गट व पाचवी ते सातवी या दोन गटांत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा झाली. दोन्ही गटांत ३२ स्पर्धक सहभागी झाले. लहान गटात उर्मी मेस्त्री तर मोठ्या गटात सुजाता पार्टे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, प्रवीण पारकर, परीक्षक शंभू गोसावी, ज्योतीराज केळूसकर यांनी मुलांना मार्गदर्शन, कौतुक केले. संगीत विद्यालयाचे संचालक अर्जून पेंडूरकर यांनी अशा प्रकारे खुल्या गटातही गायन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या स्पर्धेतील पहिली ते चौथी गटात प्रथम उर्मी मेस्त्री (मसुरे देऊळवाडा), द्वितीय दुर्वा चिरमुले (कट्टा क्रमांक १), तृतीय कार्तिक ढोलम (नांदोस गावकरवाडा), उत्तेजनार्थ खुशी वाईरकर (कट्टा क्रमांक १), गणेश नांदोसकर (नांदोस सारंगवाडी), गौरेश गावडे (साळेल), पियुष गावडे (पेंडूर क्रमांक १), मंथन पारकर (नांदोस-सारंगवाडा) यांनी यश संपादन केले. पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम सुजाता पार्टे (गुरामवाडी क्रमांक २), द्वितीय मधूर पेंडूरकर (वराडकर हायस्कूल कट्टा), तृतीय प्रिया पेंडूरकर (न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर), उत्तेजनार्थ सिद्दी गुराम (वराडकर हायस्कूल), निधी जांभवडेकर (गुरामवाडी क्रमांक २), स्वराज बागवे (मसुरे-देऊळवाडा), प्रियेश (न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर), साची गावडे (तिरवडे) यांनी यश मिळविले. गुणवंत स्पर्धकांना शैक्षणिक भेटवस्तू आणि प्रशस्ती पत्र तसेच सहभागींना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सेवांगण कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, दीपक भोगटे, अर्जून पेंडूरकर प्रविण पारकर, शंभू गोसावी, संगम चव्हाण, गीता नाईक, ज्योतीराज केळूसकर, हार्मोनियम वादक महेश तळगावकर, ढोलकी वादक भगवान काळसेकर, श्रीमती माईणकर, संपदा भाट, श्रीमती झोरे उपास्थित होते. दीपक भोगटे यांनी प्रास्ताविक तर सेवांगणच्या कार्यवाह वैष्णवी लाड यांनी सूत्रसंचलन केले. ग्रंथपाल श्रीमती जांभवडेकर व श्रीधर गौधळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com